RSS

फॉरेस्ट गम्प.. – एक अनुभव !!

21 ऑक्टोबर

एक अतिशय नितांत सुंदर सिनेमा पाहिला मी गेल्या आठवड्यात.. आता नाव सांगितलं ना तर अत्यंत लेट करंट लेबल बसण्याची दाट शक्यता आहे..हा एवढा मोठा धोका असूनही, तो अनुभव कथन करावासा वाटतोय .. खरचं हा सिनेमा केवळ सिनेमा नाहीच आहे मुळी..तो एक अनुभव आहे.. हा सिनेमा आला १९९४ मध्ये.. तेव्हा आपली अवघी हिंदी सिनेसृष्टी हम आपके है कौन मय होती.. अर्थात मी पण.. आणि या अप्रतिम कलाकृतीकडे लक्ष जायला तब्बल १५१६ वर्ष जावी लागली.. तर आता नमनाला घडाभर तेल पुरेतर सिनेमा आहे फॉरेस्ट गम्प..

अरे काय भन्नाट चित्रपटटॉम हॅन्क्स हा अतिशय संवेदनशील आणि चतुरस्त्र अभिनेता आख्खा चित्रपट स्वतःच्या अभिनयच्या बळावर व्यापून टाकतो..

सुरुवात होते तीच इतकी मनाची पकड घेणारी.. आपला हा फॉरेस्ट गम्प वाट पाहतोय एका बसची.. आणि शेजारी बसचीच वाट बघत बसलेल्या एकीशी तो अचानक संभाषण सुरू करतो आणि विषय तर काय तर पायतले बूट.. दोन क्षण कळेनासे होते.. की हा नक्की काय बोलतोय

लगेच सीन दुसरा.. एक लहानगा मुलगा बसलाय एका बेंचवर बसचीच वाट बघत..

या मुलाकडे पहाताना सर्वात प्रथम लक्ष जाते ते त्याच्या पायांकडे.. कसल्याश्या लोखंडी आधाराने जखडलेले त्याचे पाय, आणि चेहर्‍यावरचे त्याचे निरागस भाव.. आणि वार्‍याबरोबर उडत येणारे एक पीस.. सगळा माहोलच आपण आता या फ़ॉरेस्ट गम्पच्या विश्वात रंगून जाणार आहोत अशी ग्वाही देत रहातो हा प्रसंग..

हळूहळू.. अगदी अलगद कथा उलगडत जाते.. पायाने अधू असणारा (खरं तर त्याच्या पाठीच्या मणक्यात काहीतरी दोष असतो ज्यामुळे.. तो नीट चालू शकत नसतो) हा फॉरेस्ट आणि त्याची आई दोघेच रहात असतात..ग्रीनबो , अलाबामामधे.. फॉरेस्ट फक्त पायानेच अधू नसतो तर त्याचा I.Q. सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा कमी असतो..पण त्याची आई सतत त्याला सांगत रहाते..की तु वेगळा नाहीस..जे जे तुझ्या वयाचे तुझे मित्र करू शकतात ते सगळे तु सुद्धा करू शकतोस.. त्याच्या मनावर हे ती अगदी सोप्या भाषेत आणि निरतिशय प्रेमाने हे बिंबवत रहाते

मित्र म्हणावे तर असे कोणी नसतेच फ़ॉरेस्टला.. पण एक मैत्रिण मात्र मिळते.. स्वतःला जणू पक्षी होवून खूप खूप दूर उडून जाता यावं म्हणून प्रार्थना करणारी.. फ़ॉरेस्टला मनापासून साथ देणारी.. आणि त्याच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर अमुलाग्र बदल घडवून आणणारी जेनी..

या दोघा लहानग्यांना एकदा त्यांचेच काही मित्र त्रास देतात.. त्यांच्यापासून बचावासाठी फॉरेस्टला ती जोरात ओरडून सांगती रन फॉरेस्ट रन.. ” साधं नीट चालता न येणारा हा मुलगा.. आधी अडखळत, धडपडत..पळायला लागतो.. त्याच्या पायाची बंधन गळून पडतात.. जणू नवीन आयुष्य मिळत त्याला ..आता जिथं जायचं तिथं हा पठ्ठ्या पळतचं जायला लागतो.. वयाची ८१० वर्ष बंधनात घालवल्यावर मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंत अवर्णनीय असतो त्याच्या लेखी..

असेच वर्ष उलटतात.. केवळ त्याच्या अतिशय वेगाने धावण्याच्या या गुणामुळे.. त्याचं महविद्यालयीन शिक्षण अतिशय सुखकर होत.. पुढे हा सैन्यात जातो.. व्हिएतनाम युद्धात लढतो, आणि तिथे प्रवेश होतो त्याचं आयुष्य पुन्हा बदलून टाकण्यात महत्वाचा वाटा असणार्‍या दोघांचा..एक त्याचा कमांडिंग ऑफिसर डॅन आणि एक जवळचा मित्र बेंजामिन ब्लू.. उर्फ़.. बब्बा.. (bubba) .. हा त्याचा जिवश्चकन्ठश्च मित्र बनतो.. हा bubbaभलताच मजेशीर अवलिया असतो.. हा अहर्निश विचार करत असतो.. श्रिम्पचा..त्याला एक मोठी बोट बांधायची असते.. आणि आयुष्यभर श्रिम्प पकडत समुद्रकिनारी रहायचं असतं..फॉरेस्ट त्याला वचन देतो या युध्दानंतर मी तुला तुझी बोट बांधायला मदत करेन..

पण नशीबाला हे मान्य नसतं.. bubba.. युध्दात मृत्युमुखी पडतो.. आणि फॉरेस्ट त्याच्या वेगाने पळण्याच्या जोरावर पुन्हा एकदा.. स्वतः तर वाचतोच पण.. लेफ़्टनंट डेन सहीत त्याच्या अनेक सहकार्‍यांना वाचवतो..

युद्ध संपत..ठरल्याप्रमाणे हा श्रिम्पसाठी बोट बांधतो सुद्धा आणि बोटीचं नाव जेनी… , डेनच्या मदतीने यशस्वी सुद्धा होतो.. यशस्वी होवून घरी परततो.. दरम्यान त्याची आई वारते.. जेनी त्याला लग्नाला नकार देते.. हा अशाच मनाच्या एक अवस्थेत पळायला सुरुवात करतो , आणि पळतच रहातो.. थोडेथोडके दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्ष आणि काही महिने.. त्याला अनेकजण साथ द्यायला धावू लागतात,,

मग अचानक तो थांबतो, घरी परततो.. जेनीला भेटतो, आणि तिच्या बरोबर असणार्‍या आपल्या मुलाला, तिच्याशी लग्न करतो, अतिशय अल्प सहवासात तिच्या आजारपणात तिला साथ देतो, तिच्या पश्चात अतिशय प्रेमाने मुलाला जपतो, तो आपल्यासारखा नसून अतिशय हुशार आहे या कल्पनेनेच हुरळून जातो

या एकाच माणासाच्या आयुष्यात किती घटना घडतात.. चित्रपट बघताना जाणवलचं होतं.. पण आज लिहिताना मी हा चित्रपट पुन्हा जगला.. किती नानारंगी रंगानी रंगलं होतं त्याचं आयुष्य..

केवळ मन लावून आणि श्रद्धेने काम करण्याच्या एका गुणामुळे.. कुठल्या कुठे पोचला फॉरेस्ट..बुद्धी नाही म्हणून हिणवला गेलेला फॉरेस्ट कुठे आणि हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत कल्पनेपलिकडे यश मिळवणारा फॉरेस्ट कुठे.. का आपण फक्त पुस्तकी बुद्धीला महत्व देत रहातो अजून ..फार फार प्रकर्षाने जाणवलं हे.. एक सच्चा मित्र, सच्चा प्रेमी, अतिशय प्रामणिक सहकारी, एक हळावा मुलगा, फार फार शूर, धाडसी फॉरेस्ट समोर आला या चित्रपटातून..

आता टॉम हॅंक्सबद्दल बोलण्याची माझी कुवतच नाही.. काय सुंदर अदाकारी.. काय सहजसुंदर अभिनय, त्याने भुमिकेचे bearing असे काही पकडले आहे ना..जणू तो आणि फक्त तोच फॉरेस्ट साकारू शकतो.. जगलाय तो ती भुमिका.. चित्रपट बघायच्या आधी मला वाटलेले, की खूप रडका आणि depressing असेल हा चित्रपट.. पण अतिशय हलक्याफुलक्या शैलीत मांडलाय सगळा प्रवास.. एक एक संवाद आठवून आठवून हसत राहवे, विचार करावा.. रंगून जावे

खरचं, हा नुसता पहाण्याचा चित्रपट नव्हेच.. हा एक प्रवास आहे, एक अनुभव आहे.. एक निरतिशय सुंदर अनुभवअगदी प्रत्येकाने अनुभवायलाच हवा असा अनुभव !!!…

 

16 responses to “फॉरेस्ट गम्प.. – एक अनुभव !!

  1. सुहास

    ऑक्टोबर 21, 2011 at 4:34 सकाळी

    माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक… टॉमचा अभिनय नेहमीच आवडला. खरंच, हा नुसता चित्रपट नाही, एक अनुभव आहे… 🙂

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 21, 2011 at 4:38 सकाळी

      खरंय सुहास.. मी हा सिनेमा इतकी वर्ष का नाही बघितला याचा पश्चाताप होतोय 😦
      इतका अप्रतिम आहे की शब्दच अपुरे पडतील..अभिनय म्हणजे काय हे tom जगून दाखवतो खरंतर 🙂

       
  2. Mahendra

    ऑक्टोबर 21, 2011 at 5:28 सकाळी

    one of the best movies i have ever seen!

     
  3. Chetan

    ऑक्टोबर 21, 2011 at 10:23 सकाळी

    मधूरा, खूपच छान वर्णन केले आहेस. माझ्या काही मोजक्या आवडत्या pictures पैकी हा एक आहे. तुझा हा लेख वाचून परत एकदा हा picture बघितल्याचा अनुभव आला. मस्तच.

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 24, 2011 at 3:09 pm

      आभार रे चेतन दादा.. मला लिहितानाच आठवण झाली तुझी.. तुझ्या आवडत्या चित्रपटांपैकी आहे हा.. त्यामुळे तुझ्या प्रतिक्रियेची वाट पहात होते.. 🙂

       
  4. Whom HAR

    ऑक्टोबर 21, 2011 at 10:58 सकाळी

    SHEVATCHE CHAR PARAGRAPH THODE JAST LIHALA HAVE HOTES! BA KI UTTAM VARNAN ANI COMMENTRY AHE.

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 24, 2011 at 3:11 pm

      धन्यवाद राहुल दादा… ब्लॉगवर स्वागत.. मलाही जाणवलं लिहिल्यावर.. जरा स्वतःचे मत जास्त लिहायला हवे होते का?? .. पण हा सिनेमा इतका अप्रतिम आहे की कितीही लिहिलं असता ना तरी अपुरेच पडले असते..

      तरीही सुचना अतिशय रास्त.. पुढच्या वेळी नक्की सुधारणा करेन.. 🙂

       
  5. देवेंद्र चुरी

    ऑक्टोबर 21, 2011 at 7:52 pm

    माझाही अतिशय आवडता चित्रपट आहे हा….
    रन फॉरेस्ट रन….. मलाही नुसत धावत सुटावस वाटलं होत चित्रपट बघून… 🙂 अप्रतिम आहे सिनेमा…

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 24, 2011 at 3:05 pm

      धन्यवाद देवेंद्र.. खरय.. नुसतं आठवलं तरी ध्येयाने प्रेरित व्हावं वाटत.. पण हे वाटण्यापर्यंतच मर्यादित रहात.. याच दुखः आहे.. 😦

       
  6. Nitin Halbe

    ऑक्टोबर 22, 2011 at 6:46 सकाळी

    अतिशय सुंदर cinema आहे ! एकाच माणसाच्या आयुष्यात किती घटना घडतात.. चित्रपट बघताना जाणवत !
    असाच एक सुंदर हिंदी सिनेमा आहे देव आनंद चा ‘गाईड’ त्या मध्ये सुद्धा एकाच माणसाच्या आयुष्यात किती घटना घडतात त्याचे सुंदर चित्रण केले आहे, bit depressing though. Hats of to ‘Goldie’ Vijay Anand.
    गाण्यांना ‘दृक शाव्य’ touch was his speciality
    नितीन

     
    • Madhura Sane

      ऑक्टोबर 24, 2011 at 3:03 pm

      धन्यवाद नितीन.. एक माणूस किती संपन्न आयुष्य जगू शकतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे forest gump 🙂
      आणि हो.. गाईड खरच अप्रतिम आहे.. मला त्यातली गाणी जास्त भावली.. आणि काळाच्या मानाने तो खूप पुढील होता.पण तरीही अवास्तव नव्हता हे विशेष..

       
  7. vinayak pathak

    ऑक्टोबर 29, 2011 at 10:31 pm

    I like your comment about movie.

     
    • Madhura Sane

      डिसेंबर 20, 2011 at 10:16 सकाळी

      बाबा.,.. मस्तच…शेवटी तुम्ही प्रतिक्रिया लिहिली म्हणायची.. मूक वाचक लिहिते झाले तर… 🙂

       
  8. Tanvi

    डिसेंबर 5, 2011 at 9:55 सकाळी

    तू एकटी लेट नाहीयेस हं…. हम तुम्हारे पण पिछे है… आता तू सुचवला आहेस म्हणून पहाणार आहे हा सिनेमा!! 🙂 अगं मी ’शिडलर्स लिस्ट’ आत्ता गेल्या महिन्यात पाहिला…. कधी कधी जगाच्या मागे चालणे बरे असते, वाद-प्रवाद सगळे संपतात आपण रमत गमत आपलं मत बनवू शकतो… हो की नाही!!! 🙂

     
    • Madhura Sane

      डिसेंबर 20, 2011 at 10:15 सकाळी

      thanku तन्वी.. हा reply सुद्धा उशीरा.. काय म्हणावं बाई मला.. 🙂 आता माझी लिस्ट सुद्धा वाढली एकाने.. शिडलर्स लिस्ट पहायला हवा… 🙂

       

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: