RSS

Monthly Archives: जानेवारी 2011

तुझी आठवण येते…..


तुझी आठवण येते…..

 

मला ना, तुझी खूप खूप आठवण येते…

येते म्हणजे अगदी बरोबरच नेते..

 

ती येते..

कधीही, केव्हाही अगदी कुठेही….

ती येते अ‌न्‌ …

गुलाबी थंडीलाही अलवार करून जाते

हळूच माझ्याच कुशीत शिरते

आणि

तू जवळच असल्याचे गुपित

कानी गुणगुणत रहाते…

 

ती येते …

अशीच अचानक दुपारची

हळूच डोकवते..

आणि मग्‌,

भर दुपारला चांदण्यात न्हाऊ घालते…

 

 

ती येते …

कातरवेळी खोल कुठेतरी साद देते..

तुझ्या माझ्या प्रेमाची लाली

मग अवघ्या आभाळाला ल्याते….

 

ती येते…

चांदण्यांच्या स्पर्शाने न्हाऊ-माखू घालते,

मायेच्या सायीने अन्‌

स्वतःच चिंब चिंब होते…

 

पण माहितेय का तुला….

जराशी वेडीच आहे ही आठवण

कधी यावं हेच न समजणारी साठवण..

ती येते…

तू अगदी समोर असताना

हातात हात आणि डोळ्यात काठोकाठ तूच भरला असताना,

मग्‌ मात्र चुकचुकते..

आणि

हलकेच टपली मारून म्हणते..

वेडूच मी आता कशी अशी आले…..

असेच रहा कायम… नकोच मी मधे मधे……..

 
4 प्रतिक्रिया

Posted by on जानेवारी 24, 2011 in कविता...