RSS

About

हा ब्लॉग सुरु करून आता वर्ष झालं खरं ,पण अजूनही हे about me सदर रिकामचं राहिलेलं..आळशीपणा म्हणावा की संकोच ते ठरत नाहीये अजून.. पण एकूणच स्वतःबद्दल लिहिण्यात अवघडलेपणा येतो हेच खरे… असो..नमनाला घडाभर तेल चिक्कार झाले… तर..मी सौ. मधुरा साने.. व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनियर.. रोजच्या कोडिंग मधून आणि जावाच्या महाजालातून रममाण होताना सुद्धा एक हळूवार आणि तरल असे काही तरी असावे अशी सतत ओढ असणारी.. कायमच मनाच्या आंदोलनांवर झोके घेणारी..स्वतःच्या अश्या स्वप्नांच्या दुनियेत रमलेली.. अस्वस्थता हा स्थायिभावचं आहे जणू माझा.. सतत नव्याचा शोध आणि जूनं सगळं जपण्याची धडपड यात गुंगलेली… अट्टल फिल्मी.. सगळ्या लवस्टोरींवर भक्ती असणारी.. जगातल्या चांगुलपणावर डोळे झाकून विश्वास टाकणारी… अशी मी

 

8 responses to “About

  1. सुहास

    एप्रिल 19, 2011 at 5:25 सकाळी

    वाह .. सुंदर ओळख करून दिलीत. आजच हा ब्लॉग सापडला…काढतो वाचून.

    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा !! 🙂

     
  2. Madhura Sane

    एप्रिल 19, 2011 at 5:53 सकाळी

    खूप खूप धन्यवाद.. हे अक्षरयात्रा अशीच सुरेल राहो एवढीच माफक अपेक्षा ठेवून लिहितेय..
    त्यात हे असे प्रोत्साहन मिळाले की हुरूप आणखी वाढतो म्हणून खास आभार… 🙂

     
  3. महेंद्र

    एप्रिल 21, 2011 at 12:41 सकाळी

    लिहीण्य़ाची पद्धत छान आहे. नियमित पणे लिहित रहा.. जरी दररोज नाही जमलं, तरीही कमीत कमी एक तरी पोस्ट- दर एक दोन आठवड्याला- आणि ते पण ठरवून… पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा..

     
    • Madhura Sane

      एप्रिल 21, 2011 at 5:03 सकाळी

      धन्यवाद महेंद्र्जी .. तुमचा ब्लॉग मी नेहमी वाचते आणि खरच हुरूप येतो मला ही लिहायला..
      नियमितपणे लिहायचे असे ठरवते आहे.. मनात विषयांची गर्दी तर नेहमीच असते पण ती मनातील विचारांची धावपळ कागदावर (ब्लॉगवर) उतरवणे ही एक कसोटी आहे..
      अर्थात कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही यावर ही ठाम विश्वास आहे.. त्यामुळे अधिकाधिक regular व्हायचा प्रयत्न नक्की करेन..

       
  4. पुष्कर कुलकर्णी

    जून 7, 2011 at 12:28 pm

    फेसबुकावर मराठी ब्लॉगर्समध्ये हा ब्लॉग सापडला. खूपच छान आहे ब्लॉग. पुढच्या सगळ्या लिखाणासाठी शुभेच्छा.

     
  5. dipti tawde

    जुलै 8, 2011 at 9:12 सकाळी

    tumchya pudhil likhanasathi shubheccha. aamchya janivanshi sadharmya asnare likhan sapdle. all the best madhura

     
  6. amrita desai

    जून 16, 2012 at 7:50 सकाळी

    Khupch chan …

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: