RSS

तुझी आठवण येते…..

24 जानेवारी

तुझी आठवण येते…..

 

मला ना, तुझी खूप खूप आठवण येते…

येते म्हणजे अगदी बरोबरच नेते..

 

ती येते..

कधीही, केव्हाही अगदी कुठेही….

ती येते अ‌न्‌ …

गुलाबी थंडीलाही अलवार करून जाते

हळूच माझ्याच कुशीत शिरते

आणि

तू जवळच असल्याचे गुपित

कानी गुणगुणत रहाते…

 

ती येते …

अशीच अचानक दुपारची

हळूच डोकवते..

आणि मग्‌,

भर दुपारला चांदण्यात न्हाऊ घालते…

 

 

ती येते …

कातरवेळी खोल कुठेतरी साद देते..

तुझ्या माझ्या प्रेमाची लाली

मग अवघ्या आभाळाला ल्याते….

 

ती येते…

चांदण्यांच्या स्पर्शाने न्हाऊ-माखू घालते,

मायेच्या सायीने अन्‌

स्वतःच चिंब चिंब होते…

 

पण माहितेय का तुला….

जराशी वेडीच आहे ही आठवण

कधी यावं हेच न समजणारी साठवण..

ती येते…

तू अगदी समोर असताना

हातात हात आणि डोळ्यात काठोकाठ तूच भरला असताना,

मग्‌ मात्र चुकचुकते..

आणि

हलकेच टपली मारून म्हणते..

वेडूच मी आता कशी अशी आले…..

असेच रहा कायम… नकोच मी मधे मधे……..

 
4 प्रतिक्रिया

Posted by on जानेवारी 24, 2011 in कविता...

 

4 responses to “तुझी आठवण येते…..

  1. Amit Gadekar

    जानेवारी 25, 2011 at 4:12 सकाळी

    Hi Madhura,

    Really nice post….

     
  2. मधुरा

    एप्रिल 8, 2011 at 10:37 सकाळी

    धन्यवाद अमित…

     
  3. सुहास

    एप्रिल 19, 2011 at 5:57 सकाळी

    आठवणी ह्या मुंग्याच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच आहे.

    -व.पु

    🙂

     
    • Madhura Sane

      जुलै 13, 2011 at 10:01 सकाळी

      धन्यवाद सुहास.. 🙂 फारच सुंदर ओळी आहेत या व.पुंच्या.. फार छान

       

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: