RSS

Rockstar

20 डिसेंबर

म्हणतात ना..मोठं व्हायचयं? काहीतरी बनायचयं? स्वप्न पहा.. भरपूर स्वप्न पहा.. त्यांनी झपाटून जाध्यास घ्या त्यांचा..तुमच्या प्रत्येक श्वासात त्याचे भारलेपण जाणवू द्या..मग नक्की, अगदी नक्की यश मिळालचं म्हणून समजा..अशाच एका ध्यासाची आणि थोड्याशा भरकटलेल्या भारलेपणाची कथा म्हणजे रणबीर कपूरचा नवा चित्रपट रॉकस्टार….

अगदी प्रथमदर्शनी frame पासून खिळवून ठेवणारा… तसं पाहिलं तर कथेत फारसं नावीन्य किंवा फारसं वेगळेपण नक्कीच नाही..पण चित्रपट पहाताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत रहाते आणि ती म्हणजे प्रेक्षकांना काहीतरी चांगलं देण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न..फक्त तिकीट खिडकीवर लक्ष न ठेवता एक चांगला चित्रपट बनवण्याचा केलेला अतिशय प्रामाणिक प्रयास… दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार अगदी सगळ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून केलेले काम जाणवत रहाते..

कथा साधीशीच.. सुखवस्तू कुटूंबातला एक मुलगा, जनार्दन जाखड.. आयुष्यात rockstar होण्याच्या ध्येयाने पछाडलेला..पण नक्की कसा करायचा हा प्रवास याबद्दल कमालीचा गोंधळलेला.. तुझ्या आयुष्यात दुःखच नाही त्यामुळे तुझी कला बहरत नाहीये.. असल्या कसल्याशा सल्लावर विचार करून करून थकलेला..आणि मग प्रेमभंग हेच एकमेव दुःखाचं कारण होवू शकतं हा साक्षात्कार झाल्यावर, त्याच्या आयुष्यात नकळत आलेली हीर, एक स्वछंदी मुलगी, त्या पाठोपाठ या जनार्दन जाखडचा झालेला J.J. , त्याचा यशाच्या दिशेने झालेला प्रवास, आणि मिळालेली प्रसिद्धी पचवता न आल्याने एकीकडे टोकाची लोकप्रियता आणि दुसरीकडे अतिशय कोलाहलाने भरलेले मन, परिणामी डागाळलेली प्रतिमा ..यांचं अविरहत चाललेलं द्वंद्व..

एक अतिशय mature दिग्दर्शनाचा आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयाचा उत्तम नमुना आहे Rockstar.. इम्तियाज अलीचा ठसा चित्रपटाच्या हर एका प्रसंगामध्ये जाणवत रहातो.. आजपर्यंत बर्‍याच हिंदी चित्रपटात एक विशिष्ट कथा असते आणि हर एकवेळी तिचा एक विशिष्ट शेवट घडणे अपेक्षित असते, म्हणजे जर प्रेमाचा त्रिकोणबिकोण दाखवायचा असेल तर, एकाला प्रेम मिळणे, आणि दुसर्‍याने त्याग करणॆ किंवा सरळ सरळ मरणे असे काहीसे अपेक्षित असतेपण इथे कथा साचेबद्ध होत नाही.. तर एक प्रवास बनते.. यात एक ठराविक शेवट नाही.. हिरो/हिरोईनचे एकत्र येणे नाही, प्रत्यक्ष मरणं पण नाही.. नायकाचं वर्तन/प्रतिमा पूर्णपणे बदलून त्याचं संत होणं असलं काही नाही.. किंबहुना..पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असं काही नसतं याची ग्वाही मात्र नक्की आहे..

संगीताबद्दल काय बोलणार.. रेहमान ही एक जादू आहे.. भुरळ पडणारच…. पण अगदी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो…. ” फाया कुम या गाण्याचा..एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो रेहमान आपल्यालाखरचं रेहमान हे एक अजब रसायन आहे.. इतकं भिडणार संगीत हा दर एका चित्रपटात कसा काय बुवा देवू शकतो… मोहित चौहानसुद्धा अप्रतिम… अतिशय सच्चा सूर जाणवत रहातो याच्या आवाजातून

पण खरी कमाल केलीय ती.. रणबीर कपूरने.. अप्रतिम अभिनय.. सुरवातीचा काहीसा बुजरा, घाबरट, गोंधळलेला रणबीर, हीरबरोबर धमाल करणार, उत्फ्फुल रणबीर, त्याच्याही नकळत हीर मधे गुंतत जाणारा.. घरातल्यांनी घराबाहेर काढल्यावर दर्ग्यात रहाताना खर्‍याअर्थाने संगीताचा, गाण्याचा साक्षात्कार झालेला रणबीर, यशस्वी, मनस्वी, आणि तरीही हळवा रणबीर..अप्रतिम..केवळ अप्रतिम.. Rockstar चं attitude, त्याचं वागणं, बोलणं अगदी नैसर्गिक..

हीर आपल्यामुळे कोमात जातेय हे कळल्यावर त्याची झालेली तगमग, आणि अगदी त्याचं वेळी पोलिसांनी त्याला केलेली अडवणूक, या सगळ्याने सैरभैर झालेला J.J. असा काही वठवलाय त्याने, की हा केवळ ३४ वर्षे आहे या फिल्मी दुनियेत यावर विश्वासच बसत नाही

फारसा वेगळा नसूनही वेगळा वाटणारा हा Rockstar अगदी must watch….

 

10 responses to “Rockstar

  1. सुहास

    डिसेंबर 20, 2011 at 9:34 सकाळी

    खरं सांगू ?

    माझ्या खूप अपेक्षा होत्या ह्या सिनेमाकडून आणि हौसेने बघितला सुद्धा. पहिला भाग मस्त आणि दुसरा एकदम केविलवाणा (माझ्यासाठी तरी :))

    फक्त आणि फक्त रेहमानसाठी गेलो होतो थेटरात…रणबीर चांगला शोभला, पण सिनेमा रेहमाननेचं खाल्ला 🙂 🙂

     
    • Madhura Sane

      डिसेंबर 20, 2011 at 10:08 सकाळी

      खरयं सुहास.. रेहमान जादुगार आहे….खर तर मी रणबीर ची fan नाही.. पण सिनेमा एकदम भिडला.. अभिनय जामच भारी वाटला..अर्थात खूप जणांना जेवढा अपेक्षित होता तितका जमला नाही असेच वाटले..
      पण आवडला बुवा आपल्याला.. 🙂

       
  2. Chetan

    डिसेंबर 20, 2011 at 3:42 pm

    मधूरा, उत्तम वर्णन केलं आहेस. आता प्रोब्लेम असा झाला आहे कि मला सगळी स्टोरी कळल्यामुळे माझ्या wish list वर हा सिनेमा एकदम शेवटी गेला आहे. 🙂

     
    • Madhura Sane

      डिसेंबर 20, 2011 at 6:07 pm

      अरेरे…:( अरे मी सगळी कथा थोडीना सांगितलीय… सिनेमा पाहण्यात जास्त मजा आहे.. रणबीरचा अभिनय खरोखर अतिशय उच्च आहे…. 🙂 wish list नको बदलू… 🙂

       
  3. Rushikesh

    डिसेंबर 20, 2011 at 5:06 pm

    Agadi exact varnan kelays. Ranbir ne kharokhar jeev otun kam kelay. Faya kum cha tyacha kevilvana, gondhalela chehara ani lagechach Sadda Haq cha velecha tyacha attitude…..apratim !!
    Tuza lekh agadi sahaj mala parat theatre madhe gheun gela 🙂

     
  4. Madhura Sane

    डिसेंबर 20, 2011 at 6:20 pm

    धन्यवाद… 🙂 अरे हा सिनेमा बघायला जातानाची स्टोरी पण लिहायचा एवढा मोह होत होता..पण टाळलं , तो ह्या पोस्टचा उद्देश नव्हता… 🙂 पण खरंच लिहिताना पुन्हा सिनेमा बघता असल्यासारखे वाटायला लागले.. 🙂

     
  5. sagarkokne

    डिसेंबर 20, 2011 at 7:48 pm

    मला ही चित्रपट आवडला तो रणबीर आणि रेहमान मुळेच…
    गाणी तर एकाहून एक आहेत…
    माझा ही एक लेख यावर आहे…
    http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/blog-post.html

     
  6. meghana

    डिसेंबर 21, 2011 at 1:51 pm

    Madhura.gr8 going.You will definately get a call to write as a CRITICS for movies.

     
    • Madhura Sane

      डिसेंबर 21, 2011 at 2:16 pm

      hahaha.. फारच पुढचा पल्ला गाठलात madam … 🙂
      btw..मस्त वाटल तुझी comment बघून 🙂

       
  7. Indrayani

    जून 5, 2012 at 3:04 pm

    hey madhura, me Rann ( 😀 😀 ) cha ha picture ajunahi nahi baghitala 😦 , pan ata hey varnan wachun ani visheshtaha Rann che kautuk wachun me lawkarach ha picture baghen 🙂

     

Leave a reply to meghana उत्तर रद्द करा.