RSS

संताप

14 जुलै

कालपासून  TV वर आणि आज पेपर मध्ये सगळीकडे मुंबईच मुबई भरून राहिलेय.. बातमी काय तर “मुंबईवर  पुन्हा दहशतवादी हल्ला..”  खरं सांगू.. या बातमीतला सर्वात जास्त खटकलेला शब्द कोणता.. “पुन्हा” ..असे हे पुन्हा किती  वेळा?? .. आज वर्तमानपत्रात ९३ पासून मुंबईवर झालेल्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांची यादी आलीय.. सुन्न झाले मन ती यादी पाहून..

का आपणच पुन्हा पुन्हा या हल्ल्यांना बळी पडतो.. काहीच उपाय नाही का यावर.. आणि दर वेळी सामान्य जनताच का भरडली जाते यात?  अगदी मान्य की भौगोलिक दृष्ट्या आपला देश खूप मोठा आहे.. कुठे कुठे लक्ष ठेवणार.. अरे पण एकट्या मुंबईने इतके हल्ले सहन केले.. त्यात ही फक्त झवेरी बाजार मध्ये ३ हल्ले झाले. मग निदान त्या भागाला तरी पुरेशी सुरक्षा नको??

अतिशय संताप झालाय आता.. हे कधीच थांबणार नाही का? कि हे थांबावे ही आपल्या राज्यकर्त्यांची इच्छाच नाही??  कित्ती दिवस आणि का?? नक्की काय हवाय काय या दहशतवाद्यांना ?

आणि आपणही किती सरावलोय या सगळ्याला.. अजून दोन चार दिवस फार फार तर पंधरा दिवस चर्चा होईल या सगळ्यावर..पुन्हा जो तो आपल्या विश्वात रममाण.. ते नवीन हल्ले होई पर्यंत..

अरे अजून आपण आपले गुन्हेगार पकडत नाही.. पकडले तर त्यांना मनाने सोडून तरी देतो कुठल्याशा दबावाला बळी पडून .. नाहीतर त्यांना तुरुंगात पाहुणचार तरी करतो.. का का असे??? काहीच उपाय नाही का यावर .. खरच आपण इतके हतबल आहोत का? असू तर का आहोत इतके हतबल.. या सगळ्याला आपल्या सरकारचा  संयम म्हणायचे का भित्रेपणा ? सरकारच्या कामाला analyze करायची माझी कुवत नाही. पण एक सामान्य माणूस म्हणून एक नागरिक म्हणून फार फार असुरक्षित वाटते अलीकडे.. हे सगळे कधी थांबणार? आपल्याच देशात आपणच सुरक्षित नसल्याची भावना केवढी भयानक आहे..

आता वाटते आपण सामान्य लोकांनीच काहीतरी केले पाहिजे.. काय माहित नाही मला… कसे ते ही माहित नाही.. पण काहे तरी करायला हवे एवढे नक्की.. कुठे तरी हे सगळे थांबायला हवे.. आपल्या एकजुटीने थोड्या जागरूकतेने.. हे सगळे आपल्याच लोकांसाठी तरी केले पाहिजे आपण..

फार फार उदास वाटतंय आज.. हे सगळे ऐकून त्या रागासाठी .. त्या हतबलतेसाठी आणि त्या चिडचिडीसाठी केवळ हा ब्लॉग..

 
 

7 responses to “संताप

  1. Apeksha Patel

    जुलै 14, 2011 at 6:04 सकाळी

    joparyant sarkar pakdlelya gunhegarana faasavar chadhvun khambeer panachi jaaniv denar nahi toparyant hey sagle chalat rahnar ahe….

    pan hey sagle hot astana baaki hi gosthinkade aapan durlaksha karunchalnar nahi… lokshahi mhanun nirnayana itka vel….. itka vel ki lokpal bilasathi suddha kiti tari lokancha bali gelay…

    aapan kahitari kele pahije kabool… pan kay karnar… joparyant pratyek jan ya andolanasathi tayar honar nahi toparyant kahi honyachi shakyata doorach….. ugach nahi british aaplyavar 150 varsha rajya karun rahile….

    khoop divasanantar tujha blog vachala…. chaan vatale….. mumbait yeun mi marathi pasunach khoop door houn gele hote ase vatatey…

     
  2. Madhura Sane

    जुलै 14, 2011 at 6:10 सकाळी

    खरय ग अपेक्षा… असा संताप झालाय ना.. खंबीरपणा काय असतो हेच ठाऊक नसल्यासारखे वागतंय सरकार..
    असो.. छान वाटला तुझी कॉमेंट पाहून.. अग मराठी पासून आपण असे सहजासहजी लांब नाही जाऊ शकत.. फक्त थोडा वेळ आवर्जून द्यायला हवा… 🙂

     
  3. देवेंद्र चुरी

    जुलै 14, 2011 at 6:50 सकाळी

    काही कठोर निर्णय घेतल्याशिवाय हे थांबणार नाही ..पण इच्छाशक्तीच नाही तर….
    >>>आता वाटते आपण सामान्य लोकांनीच काहीतरी केले पाहिजे.. काय माहित नाही मला… कसे ते ही माहित नाही.. पण काहे तरी करायला हवे एवढे नक्की.. +१
    नुसत्या मेणबत्त्या पेटवूनही उपयोग नाही …

     
  4. Madhura Sane

    जुलै 14, 2011 at 6:51 सकाळी

    १०० नव्हे अगदी १००० टक्के मान्य… .. 😦

     
  5. suvarna

    जुलै 14, 2011 at 7:46 सकाळी

    khar sangu madhura aaj paryant aapan sahan karat alo mhanun he punha punha hoty atta vel ali aapali suraksha aapanacha karaychi aapalyat ekjut nahi na mhanuncha asa hotay garaj ahe ekajutichi

     
  6. Alka

    जुलै 14, 2011 at 12:14 pm

    aapanch badalayala have aahe aase watate atta, konawaarhi avalambun rahun upayog nahi. karan ha prashna aapala aahe

     
  7. मनोहर

    जुलै 14, 2011 at 4:51 pm

    अफझल गुरूची फाशी अमलात आणावी यासाठी इंटरनेटच्या आधारे चळवळ उभी करण्याचा विचार व्हावा.

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: