RSS

शोधा म्हणजे सापडेल !!

08 जुलै

काल मी एक सिनेमा पाहिला.. RunAway Bride.. खरं तरं तुमच्या पैकी बर्‍याच जणांनी तो केव्हाच पाहिला असेल.. कारण सिनेमा येऊन तब्बल एक तप उलटून गेलयं.. पण नेहमीप्रमाणे मी अस्मादिकांना त्याची महती उशीरा कळली… असो..

अहाहा.. काय सुंदर आहे पिक्चर.. अप्रतिम.. ज्युलिया रॉबर्टनी इतकं सुरेख काम केलयं… असो.. त्यावर एक नवीन पोस्ट होईल..

हा सिनेमा पहाताना ना..सारखा एक विचार मनात येत होता.. काय बरं कारण असेल हिचं असं लग्नाच्या वेदीवरून पळून जाण्याचं.. न आवडलेला नवरा..(पण हे एकदा होईल दोनदा होईल.. पण इतके सारखे सारखे.. ) , काही पुर्वेतिहास.. की लग्नाची भीती… कथा साधीच असून उत्सुकता मात्र जबरदस्त लागून रहिली होती.. ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणारा आपला हिरो तिच्या सर्व माजी होवू घातलेल्या नवर्‍यांना तिला अंडी कशा प्रकारे खायला आवडतात हे विचारत असतो.. ती उत्तरे प्रत्येक जण वेगवेगळे देत असतात ..या उत्तरांमध्ये एक मजेशीर बाब ही असते की.. जो तो सांगतो तिला ना मला आवडतात तशीच सेम टू सेम अंडी खायला आवडतात.. आणि इकडे आपल्या हिरोच्या डोक्यात ट्युब पेटते… की तिला बिचारीला स्वतःचे मतच नसते.. प्रेमात पडताच ती त्याला जसे आवडते तसे वागू लागते.. तिला तेच सगळे आवडू लागते जे त्याला आवडते.. पण हे कृत्रिम वागणे ती कोठवर निभावणारं..

हे सगळे पाहून ना माझे विचारचक्र ज्या वेगाने धावायला लागले त्याला अगदी जसेच्या तसे इथे उतरवतेय आज…

किती छोटीशी गोष्ट.. मला स्वतःलाच काय खायला आवडते एवढेही माहित नसणे .. तसे बघायला गेले तर अगदीच सामान्य गोष्ट.. कारण असे बरेच जण आपल्या आजूबाजूला दिसतील आपल्याला… लांब कशाला जा.. अगदी स्वतःतच डोकावून पाहू ना.. आपल्याच बद्दल कित्तीतरी गोष्टी माहित नसतात आपल्याला… तसं पहायाला गेलं तर अगदी नेहमी ऐकतो आपण की या जगात आपले आपणच असतो आपले खरे सोबती..

पण मला ना नेहमी प्रश्न पडतो खरचं असतो का आपण स्वतःचे एक सच्चे सोबती.. ओळखतो का आपण स्वतःला पूर्णपणे?? कदाचित काहींसाठी हे उत्तर हो असेल ही.. पण बहुतांश लोकांचे उत्तर नाही असेल.. हो ना??? असे होते ना कधी कधी… कधी कधी का बर्‍याचदा.. कोणीतरी विचारते .. काय ग कसला ड्रेस आणू तुला वाढदिवसाला.. आपलं सोज्वळ उत्तर “अगं आणं तुला आवडेल तो..मला आवडेल तू आणलेले.. ” कधी आणखीही प्रश्न.. “आज अगदी तुझ्या आवडीची भाजी करू..सांग कुठली करू.. ” मला ना कुठलीही चालते.. माझे नखरे नाहीत ग बाई काही.. किती गुणी बाळ.. पण हळूहळू या कौतुकामुळे आपले मत न बनवणेच कसे चांगले असे वाटायला लागतात.,.. आणि मग मोठ्या प्रश्नांना बगल कशी द्यायची याचे ट्रेनिंग सुरू होते आपल्या मनाला आपल्याकडूनच.. हळूहळू आपण कसे आहोत याच्या पेक्षा आपण कसे असलेले समोरच्याला आवडेल तसे वागायला सुरुवात होते.. कुठे तरी स्वतःला हरवत जातोय आपण याची जाणीवच होत नाही.. नुसता मनाचा गोंधळ सुरू होतो मग.. कुठलाही निर्णय नकोच की घ्यायला असे काहीसे वाटू लागते..

माझी ना एक मैत्रिण आहे.. खूप हुशार अगदी ब्रिलियंट कॅटॅगरीत बसणारी.. नुकतेच तिचे लग्न झाले.. मी तिच्या घरी गेलेले एकदा.. तर मला विश्वास बसेना असं तिचं काहिसं वागणं..अतिशय बावळट भाव चेहर्‍यावर आणि भिरभिरी नजर.. सहज तिला म्हटले अग काय ग अशी का तू.. त्यावरचे तिचे उत्तर खरचं मला अचंबित करून गेले.. “अगं उगाच मी फार हुशार आहे हे कशाला दाखवा..त्यांना नाही आवडत आपलं सामान्य असलेलचं बरं .. ”

ही मुलगी तिचे सगळे व्यक्तिमत्त्व बदलायला निघाली होती…. का करतो आपण असे.. मान्य की समोरच्याला छान वाटेल असे वागावे.. अगदी मान्य… पण म्हणून स्वतःतील स्वतःला संपवून??? स्वतःची ओळख आपण स्वतःपासूनच हिरावून घेतोय आपण.. मग आपण होतो तरी कसे हेच कळेनासे होते..

असं कधी होतं का हो तुमचं?? कधी कधी ना आरश्यासमोर उभे राहून स्वतःकडेच टक लवून पहाताना एकदम अनोळखी वाटायला लागते.. एखाद्या गर्तेत असल्यासारखे.. काही तरी शोधतायत आपले डोळे असे वाटायला लागते.. पण काय तेच कळतं नाही.. काही तरी हवे असते पण आपल्याला काय हवे आहे हेच कळतं नाही.. काही तरी शोधत असतो.. काय ते माहित नाही .. कशासाठी ते ही माहित नाही.. कसलीशी जळमटं जाणवतात मनावर.. मळभ आल्यासारखे वाटते एकूणच रोजच्या जगण्यावर.. खरं तरं.. सगळं चांगलं तर चाललेल असतं.. शिक्षण,नोकरी,संसार..सगळं सगळं लौकिकार्थाने उत्तम तरीही कसलासा शोध घेत असते मन.. शुन्यातच..

पण या शुन्यातूनच सापडेल काही तरी नक्की हा दुर्दम्य आशावाद पाहिजे मनात.. मग कदाचित या चाचपडणार्‍या मनाला हाती काही तरी लागेल.. पण त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी शोधायचे आहे हे तरी जाणवले पाहिजे.. मग हे काहीतरी म्हणजे काय हे हळूहळू ध्यानी येईलही आपल्या.. आणि एकदा ते काहीतरी आहे तरी काय हे कळले की सारा रस्ताच मोकळा होईल की हो..मग फ़क्त प्रयत्न अथक प्रयत्न.. ते साध्य करण्याचे..

 

टॅग्स:

12 responses to “शोधा म्हणजे सापडेल !!

 1. Padmaja

  जुलै 8, 2011 at 4:57 सकाळी

  Kharach swataha jevha swatahacha shodh gheu, tevha kharya arthane ayushyala suurwat hoil

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 9:12 सकाळी

   धन्यवाद पद्मजा.. अगदी खरय बघ तू म्हणालीस ते.. हा शोध खरच घेतला पाहिजे तरच काहीतरी अर्थ आहे .. अगदी पूर्ण सहमत तुझ्या मताशी.:)

    
 2. देवेंद्र चुरी

  जुलै 8, 2011 at 6:45 सकाळी

  छान लेख …भावना पोहोचल्या…
  >>>असं कधी होतं का हो तुमचं?? कधी कधी ना आरश्यासमोर उभे राहून स्वतःकडेच टक लवून पहाताना एकदम अनोळखी वाटायला लागते.. एखाद्या गर्तेत असल्यासारखे.. काही तरी शोधतायत आपले डोळे असे वाटायला लागते.. पण काय तेच कळतं नाही.. काही तरी हवे असते पण आपल्याला काय हवे आहे हेच कळतं नाही.. काही तरी शोधत असतो.. काय ते माहित नाही .. कशासाठी ते ही माहित नाही.. कसलीशी जळमटं जाणवतात मनावर.. मळभ आल्यासारखे वाटते एकूणच रोजच्या जगण्यावर.. खरं तरं.. सगळं चांगलं तर चाललेल असतं.. शिक्षण,नोकरी,संसार..सगळं सगळं लौकिकार्थाने उत्तम तरीही कसलासा शोध घेत असते मन.. शुन्यातच..

  हे खूप खूप आवडलं आणि पटलही….

   
 3. Madhura Sane

  जुलै 8, 2011 at 6:48 सकाळी

  धन्यवाद देवेंद्र.. माझे असे खुपदाच होते.. समोरच्याला कसे वाटेल ह्याचाच विचार करता करता आपल्याला काय हवे हे विसरायलाच होते…
  आणि आरश्याचा तर माझा ठरलेला सीन..म्हटले बघू आणि पण कुणाचे असे होते का..

   
 4. Alka

  जुलै 8, 2011 at 8:54 सकाळी

  Khup sundar, really it happans, pan shabdat mandata yet nahi
  tula jamale, surekh

   
  • Madhura Sane

   जुलै 8, 2011 at 9:02 सकाळी

   धन्यवाद…. खूप खूप धन्यवाद… जमतात कधी कधी अशी जळमट मनावर.. पण कागदावर उतरली कि साफ करायला सोप्पे होते… 🙂

    
 5. rushikesh sane

  जुलै 8, 2011 at 1:01 pm

  totally agree…he khup imp ahe ki tumhi tumhala olakhana. Manmilau asana changalach asata pan yacha atirek hot nahi na he mahatvacha. Nahitar mag dusaryancha avadine vagata vagata halu halu apali avad ani mag nirnay kshamata sampunach jate.
  Khup khup chhan ahe ha lekh.

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 9:14 सकाळी

   धन्यवाद ऋषी.. आवडला ना? . आपण सगळेच कधी कधी असे स्वतःला विसरून वागत असतो.. अधे मध्ये ठीक आहे रे.. पण तू म्हणतोस तसा याचा अतिरेक झाला तर मात्र अवघड आहे.. अगदी खरं..

    
 6. Nilesh Patil

  जुलै 8, 2011 at 2:34 pm

  mi bharpur vichar kela pan mala ajunhi samjat nahi ki swatha baddal vichar karyach kiwa swtha karta dusara je kahi kartoy tyachya baddal te wait asu det kiwa changal tari tujah blog aavdala mi nakichh swtaha baddal vichar karein

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 9:17 सकाळी

   बापरे.. तुम्ही खूपच विचार केलेला दिसतोय.. माझे म्हणणे एवढेच आहे.. दुसऱ्यांसाठी जरूर वागावे पण अतिरेक नको.. स्वतः स्वतःला ओळखणे तेवढेच महत्वाचे नाही का?
   असो.. धन्यवाद. 🙂 . ब्लॉगवर मनापासून स्वागत तुमचे असेच प्रतिक्रिया देत रहा 🙂

    
 7. suvarna

  जुलै 9, 2011 at 4:29 सकाळी

  madhura tu khup chhan lihilas kharach aapan aapla asthitva visrun kadhi jato he kalatach nahi.

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 9:20 सकाळी

   धन्यवाद.. 🙂 स्वतःला दुसऱ्यांच्या रंगात ढाळता ढाळता आपला रंगच उडून जावा .. हेच टाळायला हवे नाही का ग?

   खूप छान वाटले तुझी कॉमेंट पाहून.. 🙂

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: