RSS

फिल्मी चक्कर..

29 एप्रिल

गेले काही दिवस २-३ वेगवेगळ्या पोस्टस लिहून अर्धवट ठेवायचे काम मी अतिशय नेटाने करतेय… आज आता आणि एक नवी पोस्ट लिहायला सुरुवात करतेय .. पण आज मात्र ही नक्की पूर्ण करायची असं अगदी पहिल्या ओळीपसून घोकतेय.. कारण.. कारण आज ना मी माझ्या सर्वात आवडत्या विषयावर लिहिणार आहे… मी माझ्याबद्दल सांगतानाच म्हटले नव्हते का.. की मी ना तद्दन (की अट्टल म्हणू) फिल्मी आहे.. जाम आवडते मला सिनेमा पहायला… आणि खास करून लव्हस्टोरी..

 मला ओळखणारे सगळे मला सिनेमांचा डाटाबेस म्हणतात.. का ते कळेलच तुम्हालाही…

एकदा ना ईंजिनीरिंगला असताना, माझ्या रूममेटनी (अर्थातच ती ही इतकीच फ़िल्मी आहे हे तुम्ही सुज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल नाही.. 🙂 ) फ़िल्मफ़ेअर मासिक आणले होते.. अहाहा.. खजिना खजिना म्हणतात तो हाच असेच वाटले आम्हाला..

सारं मासिक आम्ही वाचून काढले.. आणि माझे तर ते मुखोद्गत झाले होते , इतके.. की माझ्या मैत्रिणीने त्यावर माझी तोंडी परिक्षा घेतली.. आणि मी पैकीच्या पैकी गुण मिळवून त्यात उत्तीर्ण झाले.. तर असे आहे माझे फ़िल्मी ज्ञान …

बापरे.. लिहित काय होते आणि कुठे पोचले.. असेच होते.. सिनेमांबद्दल लिहायला लागले की भरकटायला होते…असो.. आता गाडी आणते मूळ मुद्द्यावर…

तर कुठे होते मी.. हां.. तर माझ्या या सिनेमा प्रेमाचे बाळकडू मला ना माझ्या बाबांकडून मिळाले.. ते स्वतः खूप सारे सिनेमे पहायचे..

 दिलीप कुमार त्यांचा अगदी पेट्ट हिरो.. त्याचे सगळे डायलॉग यांना तोंडपाठ.. मुघल-ए-आझम बघावा तर माझ्या बाबांबरोबर..

इतकी सखोल महिती की काही विचारू नका.. अगदी प्रत्येक संगितकारा पसून, दिग्दर्शकाला आलेल्या अडचणींपर्यन्त.. सगळं कसं स्पष्ट..

मी त्यांना चिडवायचे तुम्हाला अगदी स्पॉट्बॉय सुद्धा माहित असतील…

सो..जशी राजा तशी प्रजा या अनुशंगाने माझे सिनेमा प्रेम पाळण्यातच दिसले असावे… 🙂 मी ना बरेचसे सिनेमे माझ्या बाबांबरोबर जाऊन बघितलेत..अजून मैत्रिणी-मैत्रिणी सिनेमे पहायचा ट्रेंड सुरू व्हायचा होता.. आमच्या कराडमधले जे सगळ्यात चांगले theatre होते ना त्याचे मालक माझ्या बाबांचे बालमित्र त्यामुळे कुठला ही पिक्चर कुठपासून आणि कुठे ही बसून बघायची मुभा होती.. अर्थात बाबा बरोबर असतील तरच.. 🙂 मी अभ्यासात हुशार असल्याने आणि ते सगळे अभ्यास वगैरे व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे या माझ्या आवडीला बाबांनी कधी हरकत घेतली नाही.. आणि मग ही आवड चांगलीच वृव्द्धिंगत होत गेली…परीक्षा संपली की मी आणि बाबा जायचो सिनेमाला… किती बघितले असे .. याची गणतीच नाही.. 🙂

आज ना मला अश्याच काही मनात अगदी घर करून राहिलेल्या सिनेमांबद्दल सांगावसे वाटतेय.. बरेचसे तुम्ही पाहिले ही असतील.. मला खूप खूप आवडणारे हे काही चित्रपट…

सुरुवात तर माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाने केली पहिजे.. आणि तो म्हणजे सुजाता.. खरं हा मी माझ्या आत्याकडे सुट्टीत रहायला गेलेले तेव्हा टीव्हीवर पाहिला.. सुरुवातीला नको नको म्हणत.. पण नंतर.. … खरं तर मी हा सिनेमा पाहिला तेव्हा मी आठवीत असेन..

कितीसा कळला तेव्हा कोणास ठाऊक..पण आता दोनेक वर्षांपूर्वी त्याची सीडी खूप धडपड करून (त्या हकिकती वर स्वतंत्र पोस्ट होईल) मिळवली. आणि किती पारायणे केली त्याची मग…  

इतका सहज अभिनय, कुठूनही आपण अभिनय करतोय याची कल्पना ही न देता..सुरेख काम केलय नुतननी..

काय दिसलीय ती.. सुरेख.. तिच्यापुढे आजच्या सगळ्या नट्या काहीच नाही..

प्रत्येक संवाद जणू तिच्यासाठीच लिहिला गेलाय..

अतिशय बोलके डोळे.. तिचा तो शालीन चेहरा..आणि किणकिणता आवाज.. बघत रहावे तिच्याकडे असे वाटते..

कमालीचा सोशिकपणा पण तो कुठेही मेलोड्रॅमॅटीक न होवू देता फ़ार फ़ार सुंदर वठवलाय नुतनने..

सुनील दत्त बद्दल तर काय लिहायचे..

त्याचे ते तिच्यावर मनापासून प्रेम करणे आणि इतक्या सहजतेने तिचे सत्य स्विकारणे..

तिला समजावताना तिला सांगितलेली ती गांधीजींची गोष्ट..

फ़ार सहज आणि अतिशय नैसर्गिक.. कृत्रिमतेला कुठेही वावच नाही..

मला तर त्यातील ललिता पवार पण फार आवडल्या.. त्यांनी साकारलेली आजी एकदम पटून जाते अगदी त्या प्रेमाच्या विरोधी पार्टीत असल्यातरी…

त्यातले जलते है जिसके लिये गाणे तर अजरामर.. आक्ख गाणं दोघांच्या फक्त चेहर्‍यावर कॅमेरा आहे आणि काय लाजवाब मुद्राभिनय ..वा वा….

साधी सोपी गोष्ट.. ब्राम्हण कुटूंबात वाढलेली पण जन्माने दलित असणारी मुलगी आणि उच्चभ्रु कुटूंबातला मुलगा यांची प्रेमकहाणी..

 हा विषयच त्याकाळी धाडसी.. पण इतकी साधी सोपी मांडणी.. आणि एकदम बढिया दिग्दर्शन.. बिमलदांची बातच काही और…

खरं तर हा सिनेमा माझ्या पिढीचा नव्हे.. पण तरीही आपला वाटणारा.. आणि त्याच्या साधेपणातच सारे धरून ठेवणारा म्हणून खास…

असाच आणि एक साधा सरळ सिनेमा म्हणजे.. मिली.. 

जया आणि अमिताभ इतके आपल्यातले वाटतात..

कुठेही अभिनयाचा अतिरेकी अभिनिवेष नाही..

जयाचं ते मोकळं हसू..अमिताभचं ते स्वतःशीच लढणं,

त्याचा तो दुष्ट राक्षस आणि तिचं ते आपल्या नावाची कथा सांगणं..

त्याच्या मनातील ती उदासिनता तिने हळूहळू त्याच्याही नकळत काढणं,

तिच्यासाठी , तिच्या हास्यासाठी त्याचे ते स्वतःला बदलणं,

आपल्या लेकीच्या आजरपणाने मनाने खचलेले पण चेह‍र्यावर हसू कायम ठेवणारे अशोककुमार..

सगळं कसं एका संपूर्णत्वाला आलेल्या चित्रसारखे.. ह्र्षिकेश मुखर्जीं बद्द्ल तर बोलू तितके कमीच आहे…

 त्यांचा हर एक चित्रपट एक एक जीवनाचे साधेच असेल पण तत्वज्ञान सांगून जातो..

पूर्वेतिहासामुळे एक मनातल्या मनात कुढणारा नायक, आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारी पण हाती चिमुकला वेळ उरलेली नायिका..

तिच्यावरचे सगळ्यांचेच प्रेम, आणि तिचा त्याच्या सच्चेपणा वरचा विश्वास इतका सुरेख टिपलाय ह्र्षिकेश मुखर्जींनी.. की काय दाद द्यावी…

मैने कहा फुलोंसे.. किती वेळा ऐकलं तरी नव्याने उर्जा देणारे गाणे.. सुरेख.. दुसरा शब्द नाही…

 या सिनेमांनी ना आयुष्य सुंदर केल असं वाटत..मला ना यांचा साधेपणा फार फार भावला…

त्यातला सच्चेपणा आणि भावुकता आज इतक्या वर्षांनीही मनाला तितक्या आवेगाने भिडते.. अ

जूनही बरेच सिनेमे राहिलेत लिहायचे.. पण तुर्तास एवढेच ठीक आहे.. कारण..

या पोतडीत अजून दडलय़ काय हे शोधण्याआधी मलाच पुन्हा एकदा हे दोन्ही चित्रपट पहावेसे वाटतायत..

सो मंडळी… उरलेले ब्रेक के बाद.. 🙂

 

15 responses to “फिल्मी चक्कर..

  1. सुहास

    एप्रिल 29, 2011 at 5:31 सकाळी

    एकदा पुर्ण पोस्ट सिनेमा परीक्षणावर येऊ देत..वाचायला आवडेल 🙂

    सुजाता बघितला नाही अजून, मिली एकदा कधीतरी इसवीसनपूर्व काळी बघितल्याचे आठवते 🙂 🙂

     
    • Madhura Sane

      एप्रिल 29, 2011 at 6:08 सकाळी

      धन्यवाद सुहास..
      सिनेमा परीक्षणावर पोस्ट लिहायचे आहे माझ्याही मनात.. बघू कस कस जमतंय…
      बाकी.. सुजाता आणि मिली दोन्ही चित्रपट खरतर माझ्या पिढीचे नव्हे..
      कारण आम्ही शाहरुख आणि आमीर चे चित्रपट बघत मोठे झालो..
      पण तरीही हे दोन्ही चित्रपट अगदी आवर्जून पहावे असे वाटतात मला.
      सुजाता पाहिला नसेल तर गाडी जरूर पहा नक्की आवडेल..

       
  2. unsuidojo

    एप्रिल 29, 2011 at 10:34 सकाळी

    नूतन, तिचा अभिनय, तिचे एकमेवाद्वितीय सौंदर्य अहाहा..किती सुंदर वर्णन केले आहेत आपण.
    सुजाता, बंदिनी, सीमा , एका हून एक अभिनयाचा उत्तुंग अविष्कार असलेले चित्रपट.
    नूतन हि एकच अभिनेत्री बाकी सगळ्या नट्या (मोजके सन्माननीय अपवाद वगळता )असे म्हणावे अशी तिची फिल्मी कारकीर्द झाली .
    नूतनजींच्या एखाद्या चित्रपटाचे रसग्रहण वाचायला आवडले असतो. आशा करतो भविष्यात आपण नक्कीच चित्रपटांचे रसग्रहण लिहाल
    नूतन आणि बलराज साहनी अभिनयातील उत्तुंग शिखरे आणि त्यांच्या घरी निपजावेत मोहनीश आणि परीक्षित, किती दुर्दैवी योगायोग 😦
    असो नूतनजींवर चित्रित झालेल्या अनेक सुंदर गाण्यांपैकी एकाचा आनंद घेता घेता रजा घेतो

     
    • Madhura Sane

      एप्रिल 29, 2011 at 11:03 सकाळी

      धन्यवाद… आणि ब्लॉगवर स्वागत..
      नूतन ही एक वेगळीच अभिनेत्री होती कुठल्याही कृत्रिमतेची तिला कधी गरजच नाही पडली..
      तिच्या चित्रपटांचे रसग्रहण ही फार मोठी जबाबदारी आहे.. पण घ्यायला नक्की आवडेल मला..
      सीमा हा ही चित्रपट नितांत सुंदर आहे.. नक्कीच..

       
  3. महेंद्र

    एप्रिल 29, 2011 at 10:37 सकाळी

    मिली.. अप्रतिम होता. मी लहान असतांना पाहीलेला होता:) त्यातला अशोककुमार खूप आवडायचा. अमिताभ बच्चन का कोणास ठाऊक, पण त्या सिनेमात अजिबात आवडला नाही. ठोकळा अभिनय केलाय त्याने .
    सुजाता आज लावतो डाउनलोड करायला 🙂 शनीवारची सोय झाली!

     
    • Madhura Sane

      एप्रिल 29, 2011 at 11:06 सकाळी

      धन्यवाद महेंद्र्जी..

      मला जया जास्त आवडली होती मिलीमध्ये..पण अमिताभ हे खूप संयत वाटला होता..

      आणि सुजाता तर अगदी must watch आहे .. खूप सुंदर.. 🙂 🙂

       
  4. Rushikesh sane

    एप्रिल 29, 2011 at 11:36 सकाळी

    Thanks for sharing these 2 movies with us. It just made me feel that there indeed are some good movies in bollywood but we underestimate them. May be its just a matter of ‘view’. I never saw these 2 movies because they are free from kind of drama we are used to watch….may be we grew up watching a complete different genre of polished ‘KJO’ movies. But you have explored these ‘simple’ movies so much nice that i should definitely watch them and this time without any prejudice.
    Thanks!!

     
    • Madhura Sane

      एप्रिल 29, 2011 at 11:46 सकाळी

      अहाहा .. म्हणे kjo .. तू रे कधी त्याचे movies पाहिलेस प्रेमाने..

      असो. पण आता तू हे दोन्ही चित्रपट पाहायला तयार झालास.. हे ही नसे थोडुके

       
  5. Tanvi

    एप्रिल 30, 2011 at 2:29 pm

    अगं ही संपुर्ण पोस्ट मी माझ्या नावाने खपवू शकेन ईतकं साम्य आहे आपल्या शिणीमा प्रेमात 🙂 … आणि पोस्टचं टायटल देखील 🙂

    मिली हा एक असा सिनेमा आहे ज्यात मला जया आवडली, दुसरा अभिमान, नाहितर मला ती सहसा आवडत नाही….

    पोस्ट मस्तच…. क्या बात !!! 🙂

    जाता जाता…. ईंजिनीयरिंगचा उल्लेख केलाच आहेस तर हे वाच…. (वेळ मिळाला की 😉 )

    http://sahajach.wordpress.com/2009/12/09/%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/

     
    • Madhura Sane

      मे 2, 2011 at 4:53 सकाळी

      धन्यवाद तन्वी…
      सिनेमा हा अगदी लाडका विषय आहे माझा..
      इंजिनीरिंगला हा विषय असता न तर मी नक्की त्यात topper आले असते .. 🙂
      हं.. आणि आजचा तुमची पोस्ट वाचली. एकदम भन्नाट.. अर्थात नावातले साधर्म्य केवळ योगायोग हं.. 🙂 🙂

       
      • Tanvi

        मे 2, 2011 at 5:36 pm

        अगं नावातले साम्य ’योगायोग’ म्हणं किंवा आपल्या विचारसरणीतलं साम्य म्हणूया हवे तर 🙂

         
  6. Rashmi Janorkar

    मे 2, 2011 at 6:28 सकाळी

    Mastach ga madhura…Now curious about next blog for same topic…Hopefully it will be u r fav Rajshree Production..heheh…masta maaja aale pan ha blog vachun…

     
    • Madhura Sane

      मे 2, 2011 at 6:31 सकाळी

      धन्यवाद ग रश्मी..
      आता नक्की माझे एकदम एकदम फेवरेट राजश्री प्रोडक्शन आणि ते ही.. सुरज बडजात्या चे हं फक्त…
      नक्की नाकी.. येईल त्यावर ही ब्लॉग

       
  7. Jyoti Patil

    मे 2, 2011 at 10:18 सकाळी

    Madhuraaa 🙂 🙂 🙂
    once again, mastaa. nicely written. I like. 🙂
    keep them coming. 🙂

     
    • Madhura Sane

      जुलै 13, 2011 at 9:55 सकाळी

      thank u thank u.. somehow i missed replying this one.. sry.. 🙂

       

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: