RSS

असं होतं का हो कधी तुमचं ???

11 मार्च

असं होतं का हो कधी तुमचं?? एक अनामिक अस्वस्थतेची लहर नव्हे नव्हे लाटचं येते उभ्या जगण्यावरखरं तरं खूप छान चाललेलं असतं सगळं..

चांगली (की गलेलठ्ठ म्हणू) नोकरी, उत्तम घर, कदाचित गाडी इत्यादी इत्यादी यापेक्षा सुंदर काय असणार असं सगळ्यांना वाटतं असतं तरीही एखादं मन मात्र

अस्वस्थ असतं या सर्वात असुनंही काही तरी शोधतं असतं एक प्रकारची अस्वस्थता असते..शिथिलता..पण ही येतेय का आणि कुठुन याचा काही शोध लागता लागतं नाही….

माझं ही असचं झालयं असं थोडसंम्हणुन म्हटलं जरा तुम्हालाही विचारुया तुमचं ही होतं का हो असं???

कदाचित रोजचा दिवस अगदी कालच्या सारखाच उगवतोयं याची खंत सतावतेय..नवीन अनुभव, नवीन आव्हानं हवीयतं ती सापडतं नाहियेत..

पण, खरं सांगू..या सगळ्यातून मरगळ आली असेल कदाचित पण निराशा नक्कीच नाही..

कारण, कुठे तरी जाणवतयं की या अस्वस्थतेतूनच एक नवा ध्यास सपडणार आहे..जोवर ही अस्वस्थता आहे ना..तोवर त्यातून बाहेर पडण्याची जिद्द काम करणारच..

खरी भिती असते ती निश्क्रिय मनाची..त्यापेक्षा ही अस्वस्थता किती तरी चांगली

यातूनच मग एक नवा सूर सापडेलं..एखादी सुंदर तान आख्खं जगणंच एक मैफ़िल करून टाकेल..

ज्याची त्याची ही तान भिन्न .. कुणाचि गप्पांच्या फ़डात, कुणाचि पहाटेच्या दवबिंदूना झेलतं फ़िरण्यातं, कुणाचि पुस्तकातल्या मौक्तिकात आणि कुणाचि टापटीप घरातं..

ती शोधायला हवी असं वाटणंच तिच्या पर्यंत पोचण्याचं पहिलं पाऊलं नव्हे काय??

जर स्वप्नं पाहिलचं नाही तरं ते पूर्ण करायची आसं कशी काय लागणार ? आणि आसचं नाही लागली तर ते स्वप्न ध्यास बनून प्रत्यक्षात उतरणार तरी कसे?

म्हणून ना, खूप खूप स्वप्न बघावित,उराशी बाळगावी आणि ध्यास घेऊन सत्यात ही उतरवावित

पण, मला ना जरा जास्तचं स्वप्न पडतात.. आणि त्यातल्या कुणाचा ध्यास घ्यायचा तेच कळेनासे होते कधी कधी..

म्हणजे ना.. कधी कधी (किंवा रोजचं म्हणा ना) खूप खूप वाचवे..नवं नवं लिहावं काहितरी, अगदी मनाच्या स्पंदनांइतकं नितळं आणि प्रामाणिक..

कधी वाटतं, रंगांच्या दुनियेत चित्रांना नव्याने समजून घ्यावे..

घराचे घरपणं मनसोक्त अनुभवावे..

नवीन नवीन (अर्थात चविष्ट आणि रुचकर) पदार्थ करावेत आणि खाऊ घलावेत..

बाग फुलवावीइत्यादी इत्यादी ….

अरे बापरे.. फ़ार जास्त पर्याय झाले ना..

कदाचित सगळे नाही जमणार एकावेळी.. पण यातला एखादा पर्याय बनून ही जाईल माझी तान..

पण त्याचा शोध मात्र घेतला पाहिजे मला, अगदी मनापसून.. सगळा आळस, शिथिलता झटकून.. आणि अगदी या क्षणापासून……

 

11 responses to “असं होतं का हो कधी तुमचं ???

 1. Shital kulkarni

  मार्च 11, 2011 at 6:56 सकाळी

  ag,aaplyala padanare sare prashna sarkhech kase astat g? tula aathavatay ka mi punyat tuzya ghari aalyawar yach wishyawar kitti kitti bolalo hoto… kharach kadhi aani kewha sapdanar aaplyala aapli tan…

  baghu tula sapdali tar mala nakki sang.

  ekdum sahi zalay lekh. aaplya bhashet ” Lay bhari”

  ashich lihit ja…. take care

  ok…. bay

   
  • Madhura Sane

   एप्रिल 8, 2011 at 10:40 सकाळी

   कधी कधी मैत्री इतकी दाट असते ना.. की प्रश्न ही अगदी सारखे पडतात मग..
   संदीप खरे म्हणतो तसे..
   प्रश्न मला जो पडला नाही त्याचे ही तुज सुचते उत्तर…
   म्हणजे.. आता माझ्या प्रश्नांची उत्तर तुला शोधायला लावून मी नवे प्रश्न निर्माण करायला मोकळी…:) 🙂

    
 2. rushikesh

  मार्च 11, 2011 at 3:02 pm

  tumhala tumacha dheya lavakarach gavaso ya shubhechha.

   
  • Madhura Sane

   एप्रिल 8, 2011 at 10:44 सकाळी

   धन्यवाद… आपण मिळूनच तर ही सगळे ध्येय आणि स्वप्न साकार करायची आहेत ना…

   आणि तुझी साथ अशीच कायम आहे ना मग झाल तर.. प्रश्न मग प्रश्न उरणारच नाहीत नाही??..

    
 3. Prashant Redkar

  मार्च 12, 2011 at 8:09 सकाळी

  मधुरा,
  खुप छान लिहिले आहे 🙂
  माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

   
  • Madhura Sane

   एप्रिल 8, 2011 at 10:46 सकाळी

   धन्यवाद… प्रशांत ..

   तुमचा ब्लॉग खूप छान आहे.. एकदम भारी…

    
 4. सुहास

  एप्रिल 19, 2011 at 5:54 सकाळी

  प्रत्येक भावनाशील व्यक्तीला असे प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे…

  खुप शुभेच्छा 🙂

  मराठी ब्लॉगर्स नावाचा एक ग्रुप सुरु केलाय आम्ही, आपली इच्छा असेल तर आपण सहभागी होऊ शकता आणि जूनमध्ये मराठी ब्लॉगर्स मेळावासुद्धा आहे मुंबईत 🙂

  http://www.facebook.com/home.php?sk=group_102652033152863&ap=1

   
 5. indrayani

  एप्रिल 29, 2011 at 6:52 सकाळी

  farach sundar ga. khup chan 🙂

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 9:58 सकाळी

   अरेच्चा .. तुला reply करायचा राहूनच गेलेला दिसतोय…
   खूप खूप आभार ग प्रतिक्रियेबद्दल..

    
 6. Aparna

  एप्रिल 29, 2011 at 5:33 pm

  छान लिहिलंस ग…माझही सध्या अस होतंय पण मजा म्हणजे रोज नवा दिवस जास्त कामं घेऊन उगवतो म्हणून अस वाटतय…थोडक्यात तुझ्या

  >>कदाचित रोजचा दिवस अगदी कालच्या सारखाच उगवतोयं याची खंत सतावतेय..नवीन अनुभव, नवीन आव्हानं हवीयतं ती सापडतं नाहियेत..

  च्या अगदी उलट…त्यामुळे जास्त क्म्फुजन..:)

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 9:59 सकाळी

   धन्यवाद अपर्णा..ब्लॉगवर मनापासून स्वागत..:)

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: