RSS

चाफ्याची फुले

19 मार्च

|||||| चाफ्याची फुले ||||||

वर्षा ऋतूतील कुंद संध्याकाळ ,
दिवसभराच्या वर्दळी नंतर सैलावलेला रस्ता,
मधूनच तान घेणारा तो लहानगा पक्षी ,
त्या वळणावर अबोल.. ते दोघे आणि त्यांना सोबत करणारी ते टपोरी चाफ्याची फुले,  तितकीच मुग्ध, अबोल पण सगळ काही बोलून जाणारी !!

तो म्हणतो, तसा, आख्खा दिवस जादूचा होता….
बाहेर बरसणाऱ्या श्रावणसरी,
सरींनी आनंदून ओली चिंब झालेली ते नाजुकशी जुई,
भारावून टाकणारा तो तृप्त मृद्गंध,
येणाऱ्या सरीमागून सरीमुळे काचेवर होणारा हलकासा आवाज ,
बाजूच्या चाफ्याच्या फुलांवर जमलेले टपोरे पावसाचे थेंब
आणि दोघांच्या हातात वाफाळणारी  coffee , आणि सोबत कधीही न संपणाऱ्या गप्पा …  विषयामागून विषयांचे अखंड चाललेले संवाद!!!

एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटावे असे सगळे क्षण एकत्र करून जणू बनला होता तो दिवस…
एखाद्या चित्रकाराने जणू आपले सगळे कौशल्य पणाला लावून चित्रातील प्रत्येक रेष रेखली , जणू त्यातील प्रत्येक प्रतिमा ही त्या चित्राचाच भाग होण्यासाठी जन्माला आली
आणि,  त्या चित्रात रंग भरण्याची जबाबदारी मात्र त्या चित्रकाराने त्या दोघांवर देऊन टाकली..
त्या चित्राचे रंग अधिकाधिक सुंदर करत ते दोघेही त्यात गुंगून गेले , स्वतः बरोबर त्या चित्रातच जणू सामावून गेले..

पण….आता अगदी नको वाटत असतानाही समीप येत चाललेली ती निरोपाची कातरवेळ..
दोन्ही बाजूनी बहरलेल्या चाफ्याच्या झाडांमधून वळण घेणारा तो निस्तब्ध रस्ता आणि त्यावर मूकपणे चालणारी ती दोघ..,
मूकपणे एकमेकांना सोबत करणारी!!
खऱ्या अर्थाने सोबत असण्याचे रहस्य हलकेच उलगडत होत तेव्हा,
शब्दावाचून संवादाचे उलगडत जाणारे पदर नवे होते दोघांनाही , मौनाची भाषा नवी होती दोघांनाही..
त्यांच्या या मौनात त्यांना सोबत होती त्या स्निग्ध चाफ्याची, अगदी मूकपणे !!
पण शब्दांची खरच उरली होती का काही गरज आता ??

“जाणं खरंच इतकं गरजेचं आहे का रे? ” तिचा मूक प्रश्न ,
“मला तरी कुठे जावसं वाटतंय?” त्याचं मुग्ध निशब्द उत्तर ,
“मग का जातोयस असा ?” हळव्या मनाचा हळवा पण मनातच गहिवरलेला प्रश्न ,
तो शांत , स्तब्ध…..
“इतक्या सुंदर दिवसात आपल्या सोबत असणारी आणि आता अगदी आपल्यासारखीच मूक झालेली चाफ्याची ही फुले तुझ्याचसाठी , तुझ्या ओंजळीत ,
आपल्या भेटीची आठवण म्हणून” त्याचं हळुवार उत्तर….

आणि मग, जड मनाने वळणारा तो..
आणि तो दिसेनासा होई पर्यंत त्याला मुग्धपणे पाहणारी ती..
आणि ओंजळीतील ती चाफ्याची फुले तशीच स्निग्ध …
फरक होता तो इतकाच,  आता त्या टपोऱ्या चाफ्यावर आता होते,  पावसाच्या थेंबाऐवजी नकळत ओघळलेले तिचे ते टपोरे अश्रुबिंदू…..

 

26 responses to “चाफ्याची फुले

 1. Sagar

  मार्च 19, 2010 at 11:24 सकाळी

  Really nice
  Think so u need to start doing this very regularly!

  Keep updating ur blogs i will the visitor for these type of literature come poetry!

   
 2. Rahul Pardeshi

  मार्च 19, 2010 at 12:15 pm

  Greaatttt….!!!
  You should have published before also…
  Keep it up !!!

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:12 सकाळी

   धन्यवाद राहुल.. ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत..

    
 3. देवेंद्र चुरी

  मार्च 19, 2010 at 1:52 pm

  सहज-हळुवार…मस्त…

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:12 सकाळी

   धन्यवाद देवेंद्र .. ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत..

    
 4. Rasika Kulkarni

  मार्च 19, 2010 at 2:24 pm

  It is very nice Madhura….really heart touching….

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:13 सकाळी

   धन्यवाद ग रसिका.. छान वाटलं तुझी प्रतिक्रिया पाहून.

    
 5. jyoti patil

  मार्च 19, 2010 at 3:02 pm

  gtr, mast aahe. feels nice t read sumthing frm you again. n its beautiful.,

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:14 सकाळी

   वा वा.. Again शब्द फार फार आवडला.. खरच पुन्हा असे लिहायला लागल्यावर फार छान वाटतंय..

    
 6. Gauri Bapat (Kelkar)

  मार्च 19, 2010 at 9:11 pm

  Fantastic !….
  Really very touching !….

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:14 सकाळी

   धन्यवाद गौरी.. ब्लॉगवर मनापासून स्वागत..:)

    
 7. amrita

  मार्च 24, 2010 at 8:16 सकाळी

  Dear madhura,
  Ag kharch kay lihilays na tu…… Rapchik..
  Zakas….Bhannat …..kay??nakki shabd tari kay wapru??
  Ki eakdam khallasch…..!!!!!!!!

  Me tar tula smjayche ki tu Fakt abhyas karnari ani
  pustkatch ramnari mulagi ahes…
  tuza navinch pailu samjala…..aaj.

  mastt kelas he kam …….
  Ya feeligs jyane anubhavlya ahet tyalach kalel mahtwa…
  shabdat mandne saglynach jamat as nahi g…….
  Tula jamatay karan, tas man ani ti pratibha ahe tuzykade
  he tu manya karaylch havas…….

  koni somya gomya uthala ani lihial as hot nahi….
  kharch amchya manatalya bhavna tu shbdat mandun ……..
  punha ekada ni:sabda karun taklas g…

  Ani harbharyachya zadavar chadhwaych mhanshil tar..
  Jatichya pratibhela konachya shifarasichi garaj naste…
  ………..kadhich.!!!!!!!!
  Tuzya ya haluwar blg la pratisad hi tasach oola,
  haluwar karayla hava pan……… te shabdanche bhandar
  amche nave….. chala pan Tansen naslo trai Kansen matra
  nakkich ahot amhi……..

  So Bindhast lihit raha tu……..

  Tuzya blg che fan.:)

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:15 सकाळी

   वा. अमृता छानच आहे कॉमेंट तुझी.. तूही आता लिहायाला सुरुवात कर.. फार छान लिहिशील तू..खात्री आहे मला..

    
 8. rutuja

  एप्रिल 6, 2010 at 9:42 सकाळी

  its fantabulous yaar….really amazing…….

   
 9. Amit Gadekar

  सप्टेंबर 1, 2010 at 5:37 सकाळी

  Just awesome….
  No other comments..

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:16 सकाळी

   धन्यवाद अमित.. ब्लॉगवर स्वागत अगदी मनापासून

    
 10. सुहास

  एप्रिल 19, 2011 at 6:07 सकाळी

  सुपर्ब !!

   
  • Madhura Sane

   एप्रिल 20, 2011 at 5:37 सकाळी

   धन्यवाद सुहास.. तुमच्या प्रतिक्रिया पाहून खूप चं वाटले..
   लिखाणाला दाद देणारे वाचक असले कि हुरूप नक्कीच वाढतो..

    
 11. ganesh

  एप्रिल 26, 2011 at 12:28 pm

  Chaaaaaaaannnnnnn………………………………..

  Awesome

   
  • Madhura Sane

   एप्रिल 26, 2011 at 12:29 pm

   धन्यवाद गणेश.. ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत.. 🙂

    
 12. Padmaja

  मे 13, 2011 at 10:03 सकाळी

  tu itak sundar kas lihu shakates…..
  jya goshti mazya manat yetat,tya tu shadb baddh kasha karu shakates….
  ashi kashi g manakawadi tu?

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 10:18 सकाळी

   धन्यवाद पद्मजा.. अग मनकवडी कसली.. प्रेम जगात सारखेच.. प्रेमात पडले ना सगळ्यांना एकसारखेच वाटते तरीही आपले म्हणून काहीतरी वेगळे असेल असे उगाचच वाटत राहते.. 🙂

    
 13. Nishigandha

  जुलै 13, 2011 at 12:40 pm

  Mansane nusta sundar disna mahatvacha nasta pan sundar asna mahatvacha asta. Tu sundar distes and sunder ahes pan. tech tuzya likhana madhun reflect hotoy. All the best dear. Bravo!

   
  • Madhura Sane

   जुलै 13, 2011 at 1:10 pm

   धन्यवाद ग निशिगंधा.. खूप मस्त वाटतय त्य्झी कॉमेंट पाहून..
   केवढ कौतुक पण ते.. अग मला मनापसून आवडत लिहायला.. त्यामुळे जे वाटत ते लिहित जाते..कधी जमत कधी फसतं.. अजून शिकतेय खरतर..

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: